मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंक प्रकल्पाची आज सुरुवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते या ब्रिजच आज लोकार्पण होईल. MTHL सागरी पुलामुळे मुंबई-नवी मुंबई ही शहरच फक्त जोडली जाणार किंवा काही तासांचा प्रवास काही मिनिटांवर येणार असं नाहीय. या ट्रान्स हार्बर सी लिंकमुळे बरच काही बदलणार आहे. या ब्रिजला अटल सेतू हे नाव देण्यात आलय. MTHL गेम चेंजर ठरणार यात शंका नाहीय. यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडीच कमी व्हायला मदत होणार नाहीय, तर रिअल इस्टेट मार्केट बदलणार आहे. एखाद्या पडीक जागेत इमारत उभी राहिल्यानंतर त्या जागेला तितका भाव नसतो, पण तिथे पायाभूत सुविधा आल्या की, झटकन जागांचे दर गगनाला भिडतात. MTHL पुलामुळे नवी मुंबईच्या आसपासाच्या भागातील जागांचे दर बदलतील याबद्दल शंका नाही.
या सी लिंकमुळे नवी मुंबई एअरपोर्ट, मुंबई-पुणा एक्सप्रेस वे आणि मुंबई-गोवा हायवे काही मिनिटांमध्ये गाठता येणार आहे. त्यामुळे नवी मुंबईमध्ये घर घेणाऱ्यांची संख्या देखील वाढेल. देशातील हा सर्वात मोठा सागरी ब्रिज आहे. मुंबई-नवी मुंबई या दोन शहरांना जोडणाऱ्या सागरी सेतूमुळे 2 तासांचा प्रवास 20 मिनिटांवर येणार आहे. ही एकप्रकारची क्रांतीच आहे. “मुंबई ट्रान्स हार्बर लिंक गेम चेंजर आहे. शिवडी-न्हावा शेवा सागरी पूल हा इंजिनिअरींगचा चमत्कार आहे. कनेक्टिव्हिटीमध्ये परिवर्तनाबरोबरच रिअल इस्टेट मार्केट बदलणार आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील अंतर फक्त 20 मिनिटांवर येईल. पनवेल, उलवे या भागात मोठा विकास होईल. घराची मागणी वाढेल असा अंदाज आहे” असं मंजू यागनिक यांनी सांगितलं. ते नाहर ग्रुपचे व्हाइस चेअरपर्सन आहेत.
म्हणून याकडे फक्त एक ब्रिज म्हणून पाहता नाही येणार
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टमुळे आधीच या भागातील जागांचे दर वाढले होते. आता सी लिंक चालू झाल्यामुळे त्यात आणखी वाढ होईल असं दिसतय. त्याशिवाय मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात मेट्रोच जाळ विणल जातय याचाही जागांच्या दरांवर परिणाम होईल. भविष्यात नवी मुंबई, पनवेल या क्षेत्रात बांधकाम उद्योगात अधिक गती येईल. त्यामुळे रोजगार वाढतील एकप्रकारे विकासालाच चालना मिळेल. त्यामुळे मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंककडे फक्त एक ब्रिज म्हणूनच पाहता येणार नाही.